सिंधुदुर्ग भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्षपदी नवलराज काळे यांची फेरनिवड

वैभववाडी भाजपाच्या वतीने त्यांचा सत्कार

वैभववाडी | प्रतिनिधी : भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी श्री नवलराज काळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. वैभववाडी भाजपा च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. नवलराज काळे हे वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र असून ते ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पदी ते कार्यरत आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नवलराज काळे यांची भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष पदी फेर निवड केली आहे. वैभववाडी तालुका भाजप कार्यकारिणीच्या वतीने झालेला सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल नवलराज काळे यांनी सत्कारकर्ते यांचे मानले आभार. यावेळी भाजपा तालुका वैभववाडी अध्यक्ष नासीर काझी, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, सुधीर नकाशे, बाळा हरयान, अंबाजी हूंबे, राजेंद्र राणे, प्राची तावडे, शारदा कांबळे, नेहा माईनकर, संजय सावंत, बंड्या मांजरेकर, महेश संसारे, हुसेन लांजेकर, हर्षदा हरयाण, रितेश सुतार, दाजी पाटणकर, आनंद फोंडके, बाळकृष्ण वाडेकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते