मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत जि. प. शाळा बापरे मध्ये प्रयोगशाळेची निर्मिती

लांजा गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन

संतोष कोत्रे | लांजा : मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बापेरे या शाळेने पालक व ग्रामस्थ यांच्या मदतीने शाळेमध्ये प्रयोगशाळेची निर्मिती केली असून या प्रयोगशाळेचे उद्घाटन बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी गट विकास अधिकारी योगेश कदम यांच्या हस्ते झाले . जिल्हापरिषद मुख्याधिकारी कीर्तिकुमार पुजार यांच्या मिशन आपुलकीला लांजा तालुक्यात उत्तम प्रतिसाद मिळाला असून बापेरे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेने ग्रामपंचायत बापेरे व लोकसहभागातून एक लाख रुपये खर्चून प्रयोग शाळा उभारली आहे. उद्घाटनप्रसंगी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विजयकुमार बंडगर विस्तार अधिकारी विनोद सावंग, बापेरे गावचे गावप्रमुख परशुराम वालम ,उपसरपंच प्रणाली आगरे, ग्रामसेविका विमल शिवगण, मुख्याद्यापक प्रभाकर तांबे,नितीन कोलते,प्रियांका झोरे,शाळा व्यवस्थापन कामिटी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठया संख्येनं उपस्थित होते.

यावेळी बोलताना गटविकास अधिकारी कदम म्हणाले की ,तालुक्यात अनेक ठिकाणी मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत शाळा डिजिटल करणे व शाळेच्या भौतिक सुविधा करण्याकरिता पालक,शिक्षक व ग्रामस्थांनी बहुमोल योगदान दिल्याचे सांगितले . तसेच तालुक्यात आज अखेर मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत सुमारे दहा लाखाचे आवश्यक साहित्य लांजा तालुक्यातील शाळांना प्राप्त झाले असल्याचे सांगितले.या प्रसंगी तालुक्यातील सर्व देणगीदार यांचे अभिनंदन व्यक्त केले. तसेच गटशिक्षणाधिकारी विजय बंडगर यांनी भविष्यात शाळेतून वैज्ञानिक तयार व्हावेत याकरिता प्रयोगशाळेचा दैनंदिन अध्यापनात वापर कर