वेताळ प्रतिष्ठान च्या निबंध स्पर्धेेस खुल्या व शालेय गटात महाराष्ट्रातून प्रतिसाद
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या वतीने सलग नवव्या वर्षी खुल्या आणि शालेय गटात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही स्पर्धेत अगदी संपूर्ण महाराष्ट्र मधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सिंधुदुर्गसह अगदी मुबई, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा,पुणे, नाशिक शिर्डी, जळगाव, रत्नागिरी आदी ठीकाणाहून स्पर्धक सहभागी झाले.
शालेय गटासाठी ‘माझे आजी आजोबा हरवले आहेत’ हा वेगळा आणि आजची कुटुंब व्यवस्था कशी ढासळत चालली आहे यावर भाष्य करण्यासाठी विषय देण्यात आला होता. या विषयावर व्यक्त होताना स्पर्धेत ५९ विद्यार्थी सहभागी झाले.
निबंध स्पर्धा – शालेय गट
प्रथम क्रमांक – गायत्री लक्ष्मण वरगांवकर ( न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा)
द्वितीय क्रमांक – चैत्राली बद्रीनाथ औटे. (आपेगाव पैठण , संभाजीनगर)
तृतीय क्रमांक – श्रुती श्रीधर शेवडे.( न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा)
तर खुल्या निबंध स्पर्धेसाठी ‘इमोजीच्या या बोलघेवड्या युगात कोण ऐकल माझ्या स्पंदनाची विराणी?’ हा आगळा,-वेगळा विषय देण्यात आला होता, या विषयावर अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. खुल्या गटात एकूण ५५ स्पर्धकांनी सहभाग दर्शविला.
निबंध स्पर्धा – खुला गट
प्रथम क्रमांक – अर्जुन गोपाळ गावडे. (नेरूळ , नवी मुंबई)
द्वितीय क्रमांक – मयूर संपत तायडे. (सावखेडा शिवार जळगाव)
तृतीय क्रमांक – निर्जरा संजय पाटील (आबासाहेब गरवारे कॉलेज, पुणे)
निबंध स्पर्धचे परीक्षण बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले चे मराठी विभाग प्रमुख डॉ. पी.आर. गावडे यांनी केले.