सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट आयोजित “डेरवण युथ गेम्स २०२५” सोळा वर्षाखालील खुल्या रॅपिड बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सहा पारितोषिके पटकावली. या स्पर्धेत राज्यभरातील एकशे चोवीस मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. ॲकेडमीच्या तेरा मुला-मुलींनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला. मुक्ताई ॲकेडमीचे विदयार्थी सलग नऊ वर्षे स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.
पारितोषिक प्राप्त विदयार्थी
“खुला गट” तृतीय क्रमांक यथार्थ डांगी चौथा क्रमांक विभव राऊळ
“बेस्ट अनरेटेड गट”
तृतीय क्रमांक हर्ष राऊळ
“१५ वर्षाखालील गट”
द्वितीय क्रमांक पुष्कर केळूसकर
“१२ वर्षाखालील गट”
प्रथम क्रमांक अथर्व वेंगुर्लेकर
द्वितीय क्रमांक चिदानंद रेडकर
ॲकेडमीच्या वरील विदयार्थ्यांसोबत यश सावंत, गार्गी सावंत, साक्षी रामदुरकर, मानस सावंत, लिएण्डर पिंटो, पार्थ गावकर, विराज दळवी हे विदयार्थी-विदयार्थिनी सहभागी झाले होते.सर्वांनी चांगला खेळ करून सात राउंड्सपैकी चार ते सहा राउंड्समध्ये विजय मिळवले.
सर्व विदयार्थ्यांना मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर आणि ॲकेडमीचे राष्ट्रीय बुदधिबळ कोच उत्कर्ष लोमटे यांचे मार्गदर्शन लाभले.











