Accident | हळवल रेल्वे फाटक गेटला टेम्पोची धडक!

गेटचे मोठे नुकसान ; रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल

कणकवली : येथील हळवलच्या दिशेने येताना जाताना रेल्वे गेट आहे. हा गेट वाहनचालकांना डोकेदुखी ठरणारा असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्यच आहे. मात्र याठिकाणी ये – जा करत असताना वाहनचालकांचा मोठा हलगर्जीपणा दिसून येतो. अनेकदा या ठिकाणी मुक्या जनावरांना धडक बसलेल्या आहेत. मात्र आज सकाळी ८ :३५ ते ८:४० वा. च्या सुमारास एका अशोक लेलँड ( जिए ०३ एन १६१२ ) हा टेम्पो हळवलहून कणकवली च्या दिशेने जात असताना हळवल येथील रेल्वे गेट जवळ आला असता रेल्वे गेटला धडला. रेल्वे गेटला बसलेली धडक एवढी जबर होती की रेल्वे गेट मध्यभागावून दुमडला गेला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस हळवल रेल्वे फाटक येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेची पहाणी केली. यावेळी धडक दिलेल्या टेम्पो चालकाला टेम्पोसह हळवल रेल्वे फाटक येथे थांबवून ठेवण्यात आले होते. पुढील कारवाई सुरू होती.