ओसरगावात दारूसह सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त ; एक्साईजच्या कोल्हापूर भरारी पथकाची कारावाई

बांदा | प्रवीण परब  : कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील बस थांब्या समोर गोवा बनावटीची दारू वाहतुक करणाऱ्या कंटनेवर कोल्हापूर एक्साईज भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 70 लाख 80 हजार 360 रूपयाच्या दारू सह 1 कोटी 26 लाख 32 हजार 860 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तब्बल 1152 दारूचे बाॅक्स जप्त केले. बेकायदा दारू वाहतुक प्रकरणी चालक लक्ष्मण अर्जुन ढेकणे. वय 34 कराड याला ताब्यात घेण्यात आले . तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेला कंटेनर एन एल 01एजी 3820 ताब्यात घेण्यात आला
सदर कारवाई निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक आर जी येवलुजे एस एस गोदकर काॅस्टेबल सुशांत बनसोडे विलास पवार अमोल यादव योगेश शेलार राहुल सकपाळ याच्या पथकाने केली.