खेड | प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ या कोकण दौऱ्यावर असताना खेड भाजप पक्ष कार्यालयाला भेट देत पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला.
यावेळी शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांनी त्यांचे स्वागत केले या सत्काराने सौ वाघ या भारावून गेल्या संघटना मजबूती करणाच्या दृष्टीने राबविता येणारे उपक्रम, सामाजिक कार्यक्रम यांच्याविषयी मार्गदर्शन केले.या प्रसंगी भाजपा चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.