हातखंबा येथे होणार भाजपा नेते निलेश राणे यांचे जंगी स्वागत 

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर ते गुरुवारी [पहिल्यांदाच रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. आपल्या या लाडक्या नेत्याचे स्वागत करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

हातखंबा येथे भाजपचे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय निवळकर आणि अनेक भाजपा पदाधिकारी दुपारी १ वाजता हातखंबा येथे निलेश राणे यांचे जोरदार स्वागत करणार आहेत. त्यानंतर हातखंबा येथून भव्य रली काढण्यात येणार असून रली च्या माध्यमातून निलेश राणे रत्नागिरी शहराकडे प्रयाण करणार आहेत. कार्यकर्त्यांचे लाडके नेतृत्व असलेल्या निलेश राणे यांचे स्वागत करण्यासठी कार्यकर्ते आणि भाजपा प्रेमी यांनी मोठ्या संख्येने हातखंबा येथे जमावे असे आवाहन संजय निवळकर यांनी केले आहे.