कणकवली खरेदी विक्री संघाचा स्वत:चा पेट्रोल पंप व गॅस एजन्सी सुरू करणार

आमदार नितेश राणे यांचे आश्वासन

शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या समता बझार कणकवली नं. २ चे झाले उद्घाटन

कणकवली :   केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यासोबत चर्चा झाली असून लवकरच कणकवली खरेदी विक्री संघाचा स्वत:चा पेट्रोल पंप असू केला जाणार आहे. तसेच पुढील वर्षभरात संघाच्या माध्यमातून गॅस एजन्सीही सुरू होईल, असा विश्वास भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघामार्फत कणकवली डीपीरोडवर सुरू करण्यात आलेल्या समता बझार कणकवली नं. २ चे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,खरेदी विक्रीसंघाने समता बझार कणकवली नं. २ सुरू करून महत्वाचे पाऊल उचलले आहे. संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत व सर्व संचालकमंडळ चांगल्या प्रकारे काम करत आहे.त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, उपाध्यक्ष सुरेश ढवळ, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, समिर सावंत, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, संचालक सर्वश्री पंढरी वायंगणकर, प्रशांत सावंत, अतुल दळवी, बबन हळदिवे, श्रीपत पातडे, रघुनाथ राणे, किरण गांवकर, गणेश तांबे, लिना परब, संजय शिरसाट, पिंटू पटेल, किशोर राणे, भाग्यलक्ष्मी साटम, बाबा वर्देकर, व्यवस्थपक गणेश तावडे आदी उपस्थित होते.

आमदार नितेश राणे पुढे म्हणाले, यापुर्वी शेतकरी संघ, जिल्हा बँक, मजूर संघ याकडे लक्ष झाले.मात्रा २०१९ नंतर आम्ही लक्ष दिले.. त्यानुसार अशा संस्थावर कोण जायला हवे याची जाणीव झाली. त्यानुसार आम्ही बारकाईने लक्ष घातले. अशा शेतकरी संघांकडे शेतकरी आशेने पाहत असतो. त्यामुळे अशा संघांकडून समाजातील शेवटच्या घटकापर्यंतचा विकास साधण्याचा प्रयत्न करता येतो. या संघाचा स्वतःचा पेट्रोल पंप होण्याच्यादृष्टीने कार्यवाही अंतीम टप्यात आहे. कागदपत्रे झालेली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कार्यालय यासाठी मदत करत आहे. तसेच आपण गॅस एजन्सीही सुरू करण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. पुढील दिवाळीपर्यंत ही एजन्सी असेल. आम्ही दिलेला शब्द पुर्ण करणारे आहोत. गॅस एजन्सीच्या निमित्ताने शब्द निशाण्यावर लागेल, असेही श्री. राणे म्हणाले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन व आभार प्रकाश सावंत यांनी मानले.