दापोलीत १५० एकरवर कृत्रिम जंगल : दीपक केसरकर

रत्नागिरी: सिंधुरत्न योजनेतून विविध योजनांसाठी १३१ कोटी रुपये मंजूर झाले आहे. त्यापैकी २७ कोटी वितरित करण्यात आले आहेत. यामध्ये पेठकिल्ला येथील मत्स्यालयाला टनेल, निसर्ग पर्यटनासाठी दापोलीत कृत्रिम जंगल निा|मती करणे, प्राणी संगÏहालयाल, गणपतीपुळे प्रमाणे रत्नागिरी शहरातही वॉटर स्पोर्ट, हाउस बोटिंग सह परशुराम देवस्थान परिसराच्या शुशोभिकरणासाठी २ कोटींची निधी आदीचा समावेश आहे. या योजनेमुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासासह दरडोई उत्पन्नामध्ये मोठी वाढ होईल, असा विश्वास मंत्री तथा सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष ना.दीपक केसरकर यांनी सांगितले.

सिंधुरत्न योजनेमुळे जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होणार आहे. यातून मोफत भात बियाणे, नाचणी बियाणांचे वाटप केले. मासे विक्रीसाठी मच्छीमारांना २० स्कुटर २ कुलिंग व्हॅन देण्यात आल्या. मासळी वाहतुकीसाठीच्या इन्सुलेटर व्हॅन दिल्या. मासळी उत्पादन घेणार्यांना ओपन टपच्या जीप ५० टक्के अनुदानातुन देण्यात आल्या. आंब्यावर संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु ते आजारी असल्याने त्याचा आढावा मिळालेला नाही. हवामान बदलावर आंबा पिकाचे कसे संरक्षण करता येईल यावर अभ्यास सुरू असल्याचे ना.केसरकर यांनी सांगितले.

माशांपासून कटलेट बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी एमआयडीसीमध्ये सीएफसी स्थापन करण्यात येणार आहे. पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे उद्योग खाते असल्याने ते याचा पाठपुरावा करणार आहेत. फिरते मासळी विक्री केंद्रासाठी छोटा टेम्पो आणि दुचाकी देण्यात येणार आहे.

सुमारे १५० एकरवर निसर्ग पर्यटन केंद्राच्या माध्यमातून कृत्रिम जंगल निर्माण करण्यात येणार आहे. भाताचे मोठ्या प्रमाणात पिक घेतले जाते. तेव्हा रिकाम्या शेतांमध्ये काय करता येईल, यासाठी शेतकर्यांच्या मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्राणी संगÏहालयासाठी १०० कोटी मंजूर असून त्यापैकी ३ कोटी ८५ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. परशुरामाच्या मंदिराचाही विकास केला जाणार आहे. रत्नागिरी शहरातही जलक्रीडांसाठी ६ कोटी रुपये उपलब्ध आहेत. हाऊस बोटींग, पर्यटनासाठी बसेस, अशा प्रकारे सिंधुरत्न योजनेतून जिल्ह्याच्या विकास होणार आहे. दरवर्षाला १०० कोटी या प्रमाणे तीन वर्षे हे पैसे मिUणार आहेत. पहिले पैसे खर्च झाल्यावरच दुसरा हप्ता मिळेल, अशी माहिती ना.केसरकर यांनी दिली.