देवरूख (प्रतिनिधी)
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.) आणि महिला विकास कक्ष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मेहंदी रेखाटन आणि पाने, फुले व देवपूजेचे साहित्य वापरून तयार केलेल्या रांगोळीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना “महिला सक्षमीकरण” हा मेहंदी रेखाटनाचा, तर “आदिशक्ती रूप” हा रांगोळी स्पर्धेचा विषय देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी दोन्ही स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले.
दोन्ही संपन्न झाल्यावर विद्यार्थ्यांचे कौतुक करताना प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी रांगोळी व मेहंदी या कला महाविद्यालयाचे भूषण असून, यामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. महाविद्यालयाच्या अनेक आजी-माजी विद्यार्थिनी या कलेत करियर केल्याचे व करीत असल्याचे विद्यार्थ्यांच्या नावासह उपस्थित विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा सखोल आढावा घेतला. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व मुंबई विद्यापीठाचे कला प्रशिक्षक विलास विजय रहाटे यांचा रांगोळीतील विश्वविक्रम, तसेच त्यांनी आपल्या प्रचंड मेहनतीने कला क्षेत्रात मिळवलेल्या नावलौकिकाचा महाविद्यालय परिवाराला अभिमान असल्याचे याप्रसंगी नमूद केले.
मेहंदी रेखाटन स्पर्धेत प्रथम क्रमांक सुचिता दळवी(११वी संयुक्त) हिने पटकावला. द्वितीय क्रमांक सृष्टी नाखरेकर(११वी वाणिज्य) व रिया गोमाणे (११वी वाणिज्य) यांनी संयुक्तरीत्या मिळवला. तर तृतीय क्रमांक आर्या सुटाके(११वी वाणिज्य) हिला मिळाला आणि उत्तेजनार्थ पारितोषिक रिया सोलकर(११वी संयुक्त) हिला देण्यात आला. तर रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक शर्वरी कांबळे व मृणाल सरंदकर(११वी वाणिज्य) तसेच रिया केदारी व समिक्षा बांडागळे(१२ वी संयुक्त) यांनी संयुक्तपणे पटकावला. द्वितीय क्रमांक यश लाखण व प्रणव कांबळे(११वी कला), धनश्री कांबळे व कृतिका पांचाळ(१२वी संयुक्त), भाग्यलक्ष्मी मुळे व सृष्टी पंदेरे(१२वी वाणिज्य- ब) यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक वेदिका बेर्डे व प्रीती साठे(१२वी वाणिज्य), सृष्टी मानकर व कृतिका भेरे(१२वी वाणिज्य- ब), सिद्धी झोरे व आकांक्षा गुरव (११ वी वाणिज्य) यांना विभागून दिला गेला. उत्तेजनार्थ पारितोषिक ममता मुंडेकर व चंदना मुंडेकर(१२वी बँकिंग), तसेच तन्वी धावडे व जानवी सावंत(१२वी वाणिज्य) यांना घोषित करण्यात आले. दोन्ही स्पर्धांचे परीक्षक प्रा. धनंजय दळवी व प्रा. देवयानी जोशी यांनी केले.
या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे, महिला विकास कक्ष विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. सानिका भालेकर, प्रा. सीमा शेट्ये, प्रा. विजय मुंडेकर, प्रा. मयुरेश राणे, प्रा. वसंत तावडे, प्रा. स्वप्नाली झेपले व प्रा. वैभवी घोसाळकर यांनी मेहनत घेतली. दोन्ही स्पर्धेतून विद्यार्थ्यांना आपली कलाकारी सादर करण्याची, सृजनशीलतेला वाव देण्याची तसेच महिला सक्षमीकरणाबद्दल सजगता निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाली. स्पर्धेच्या नीटनेटक्या आयोजनासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.













