कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली येथील डॉ सूर्यकांत तायशेटे यांच्या हॉस्पिटल लगत असणाऱ्या घरामध्ये आग लागली या आगीचे प्राथमिक कारण शॉर्टसर्किट असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये एसी वॉशिंग मशीन व अन्य साहित्य जळाले ही आग रविवारी रात्री दहाच्या सुमारास लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीची घटना समजतात तत्परतेने कणकवली अग्निशामक देखील दाखल झाला होता. कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली व स्थानिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी डॉक्टर विद्याधर तायशेठे, मिथुन ठाणेकर , अण्णा कोदे, व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.












