‘पोरबंदर- कोच्युवेली’ला अतिरिक्त डबा

खेड : प्रतिनिधी
दीपावली सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पोरबंदर-कोच्युवेली एक्सप्रेसला स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने  जाहीर केले. त्यानुसार २०९१०/२०९०९ क्रमांकाची पोरबंदर-कोच्युवेली एक्सप्रेस ९ नोव्हेंबर तर परतीच्या प्रवासात १२ नोव्हेंबर रोजी स्लीपर श्रेणीच्या एक अतिरिक्त डब्यांची धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.