गुटखा विक्रीप्रकरणातील दोघे २ दिवस पोलीस कोठडीत

खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील वेरळ फाट्यानजीक ८ लाख ८० हजार रूपये किंमतीच्या गुटखा विक्रीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ‘त्या’ दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता पुन्हा दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. स्मिता कदम यांनी काम पाहिले आहे.

या गुटखा विक्री प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा-सावंतवाडी येथील आबा शिरसाट / शिरसाठ नामक व्यक्तीचा सहभाग असल्याचे उघड झाले असून त्याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने टेम्पोतून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या प्रेमल शंकर मोकल, जगदीश हरिश्चंद्र मोरे यांना गजाआड केल्यानंतर गुटखा विक्रीप्रकरणाचे बांदा टू पेण कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्या दृष्टीने येथील पोलिसांनी सखोल तपास करण्यास सुरूवात केली आहे.