सातपैकी चार पथदीप बंदच
खेड(प्रतिनिधी)भरणे-खेड मार्गावर भरणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदीपांचा दिवसाढवळ्याही ‘उजेड’ सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे ग्रामपंचायतीला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भरणे-खेड मार्गावर ग्रामपंचायतीच्या हद्दीत ७ पथदीप आहेत. यातील ४ पथदीप गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. बंद पथदीप सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीने अजूनही पुढाकार घेतलेला नाही. उर्वरित ३ पथदीप कार्यान्वित असले तरी दिवसाही उजेड देत आहेत. एकीकडे बंदावस्थेतील पथदीप कार्यान्वित करणे गरजेचे असतानाही दुसरीकडे मात्र कार्यान्वित पथदीपांचा दिवसा उजेड देवून ग्रामपंचायतींना नेमके काय साधायचे आहे, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.







