पंचायत समिती( शिक्षण विभाग) मंडणगड व न्यू इंग्लिश स्कूल तुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 50 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मंडणगड तालुका विकास मंडळ( F-1428) मुंबई संचलित राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल मंडणगड चा प्रथम क्रमांक आला. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दिनांक 14 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला.माध्यमिक गटामधून इयत्ता नववीचे विद्यार्थी पियुष भुवड व आर्यन जाधव व या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक महाडिक सर, सुतार सर व जाधव मॅडम यांचे अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे सरचिटणीस श्री. विनोद दळवी साहेब ,संस्थेचे चिटणीस श्री. दिलीप दादा जगताप साहेब व संस्थेचे चिटणीस अँडव्होकेट अभिजीत गांधी साहेब यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी संस्थेचे सदस्य व स्कूल कमिटी चेअरमन माननीय श्री.संतोष मांढरे सर व स्कूल कमिटी सदस्या सौ.सुरक्षा शेट्ये मॅडम ,राजीव गांधी स्कूलचे मुख्याध्यापक महाजन सर व मुख्याध्यापिका सौ.ठसाळे मॅडम त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील मॅडम व उपमुख्याध्यापक श्री. हुल्लोळी सर , पर्यवेक्षक श्री. बैकर सर तसेच आंबेडकर हायस्कूलचे विज्ञान शिक्षक श्री. गिरी सर,श्री.माटवणकर सर यांनीही अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे मुख्याध्यापक महाजन सर यांनीही शुभेच्छा पर आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. कर्वे मॅडम यांनी केले.यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते