” इंग्लिश मिडीयम स्कूल मंडणगडचा तालुका स्तरीय विज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक”

या वर्षीची तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन व प्रश्नमंजुषा स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल तुळशी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत घेतल्या गेलेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धेत इंग्लिश मिडीयम स्कूल मंडणगड या शाळेतील इयत्ता ९ वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी – विद्यार्थिनी यांनी तब्बल ६१ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.त्या विद्यार्थ्यांची नावे कु. नीलम मेहता आणि कु.आयुष कांबळे अशी आहेत. या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरीय विज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धेत निवड झाली आहे.भरघोस यश मिळालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचे आणि त्याच्या मार्गदर्शक शिक्षिका यांचे अभिनंदन.