कुडाळ | प्रतिनिधी : कुडाळ शहरातील भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्रथमेश बाळा कुडाळकर या 23 वर्षीय युवकाचे अल्पशा आजाराने शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
गेले काही दिवस प्रथमेश आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान शनिवारी रात्री घरी असताना त्याला अत्यवस्थ वाटु लागल्याने कुडाळ येथील एका खाजगी रूग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारा पुर्वीच त्याचे शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
प्रथमेश च्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकी, असा मोठा परिवार असुन, हरहुन्नरी व्यक्तिमत्व, मदतीला धावून जाणार्या प्रथमेश च्या अशा अकाली निधना मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत.











