शिवगंध प्रतिष्ठान लांजाच्या वतीने २० नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

लांजा( प्रतिनिधी) शहरातील शिवगंध प्रतिष्ठान लांजाच्या वतीने सोमवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी संकल्प सिद्धी सभागृह लांजा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा रक्तपेढीतील असणारा रक्ताचा तुटवडा आणि रक्ताची वाढती मागणी लक्षात घेता लांजा येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शिवगंध प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने कुमार अद्वैत प्रकाश जाधव यांच्या स्मृतिपित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २० नोव्हेंबर रोजी पोलीस वसाहत येथील संकल्प सिद्धी सभागृहात हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन शिवगंध प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व इच्छुक रक्तदात्यांनी आगाऊ नोंदणीसाठी राजू जाधव ८८०६६५५७७८ तसेच चिरायू देसाई – ९११२१०४०१० यांच्याशी संपर्क साधाव्याचा आहे.