ऐश्वर्या दुधाळला कुस्तीत सुवर्णपदक

खेड(प्रतिनिधी)मुंबई विद्यापीठ अंतर्गत पनवेल येथील सी. के. टी. महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत मोरवंडे-बोरज ज्ञानदीप औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्ष बी. फार्मसी विद्यार्थिनी ऐश्वर्या दुधाळ हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

या स्पर्धेतील ६८ किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक प्राप्त केले. तिला क्रीडाशिक्षक सकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, माधव पेठे, विनोद बेंडखळे प्रकाश गुजराथी, डॉ. सुजित नगरे आदी उपस्थित होते.