वाफोली धरणात पुरुष जातीचा मृतदेह

बांदा : प्रतिनिधी
लघु पाटबंधारे विभागाच्या वाफोली धरणात सायंकाळी उशिरा स्थानिकांना मृतदेह तरंगताना दृष्टीस पडला. पुरुष जातीचा मृतदेह असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या समवेत पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून काळोख झाल्याने व होडीची सोय नसल्याने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अडचणी येत आहेत.

स्थानिक युवक आंघोळीसाठी गेले असता त्यांना खोल पाण्यात हा मृतदेह दिसला. त्यांनी याची कल्पना स्थानिकांना दिली. पोलीस उपनिरीक्षक भोसले हे आपल्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. मात्र काळोख झाल्याने व धरणातील पाणी खोल असल्याने मृतदेह पाण्याबाहेर काढणे मुश्किल झाले आहे.