घोणसरे अरमरेवाडी येथील साई मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी आशीर्वाद नाटकाचे आयोजन

श्री साई सेवा मंडळाचा उपक्रम

संतोष कुळे | चिपळूण : तालुक्यातील श्री साई सेवा मंडळ घोणसरे अरमरेवाडी यांच्या वतीने साई मंदिराच्या जीर्णोदारासाठी आर्थिक निधी संकलन करण्याकरिता मुंबई येथील यशवंतराव नाट्यगृह येथे आशीर्वाद या नाटकाचे दि. २६ रोजी करण्यात आले आहे.
घोणसरे अरमरेवाडी येथील साई भक्तांनी साईबाबांचे मंदिर काही वर्षांपूर्वी बांधले. दरवर्षी साई भंडारा उत्सव साजरा केला जातो. मात्र आता या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा मानस श्री साई सेवा मंडळाने घेतला आहे. यासाठी आर्थिक बाब महत्वाची आहे. यासाठी मंडळाने माटुंगा येथील यशवंत नाट्यगृह येथे रविवार २६ रोजी सकाळी ९.४५ वाजता आशीर्वाद नाटकाचे आयोजन केले आहे. लेखक जगन्नाथ शिंदे लिखित आणि सुभाष गोताड दिग्दर्शित हे नाटक होणार आहे. यातुन जो निधी जमा होईल तो साई मदिराच्या जीर्णद्धारासाठी वापरण्यात येणार आहे. प्रयोग हाऊसफुल्ल जाण्यासाठी अहोरात्र मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. या नाटकात स्वतः मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते भूमिका करणार आहेत. भक्त आपल्या ईश्वराच्या भक्तीसाठी कशा प्रकारे सेवा करतो याचे एक उदाहरण म्हणजे श्री साई सेवा मंडळ आहे. या कार्यक्रमाला साई भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.