Samsung Galaxy S24 सिरीजची लॉन्च तारीख लिक, जानेवारीत “या” तारखेला होऊ शकते एंट्री

Samsung ची फ्लॅगशिप S24 सिरीज नवीन वर्ष 2024 मध्ये येऊ शकते. यामध्ये Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra असे तीन मॉडेल येणार आहेत.सर्व 17 जानेवारी रोजी लॉचं केले जाऊ शकतात.अशी माहिती समोर येत आहे. ही बातमी अचूक मानली जात आहे कारण ती ब्रँड अधिकाऱ्याने शेअर केली आहे. यासोबतच स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डर आणि सेलची तारीखही समोर आली आहे. चला, याबद्दल अधिक सविस्तर माहिती घेऊया.

Samsung Galaxy S24 सिरीज लॉन्च तारीख

  • रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S24 सीरीज 17 जानेवारी 2024 ला लॉन्च केली जाऊ शकते.
  • प्री-ऑर्डर देखील स्मार्टफोनच्या लॉन्चसह सुरू होईल.
  •  फोनची प्री-ऑर्डर करतात त्यांना 26 ते 30 जानेवारी 2024 पर्यंत फोन मिळणे सुरू होऊ शकते.
  • Galaxy S24 सिरीजचीविक्री 30 जानेवारीपासून सुरू होऊ शकते.
  • आता कंपनीकडून अधिकृत घोषणा कधी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

samsung-galaxy-s24-मालिका-डमी-युनिट्स

Samsung Galaxy S24 सिरीज  तपशील (अपेक्षित)

  • डिस्प्ले: Samsung Galaxy S24 सिरीज मध्ये 6.1-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले असू शकतो. तर Galaxy S24 Plus मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. त्याच वेळी, टॉप मॉडेल अल्ट्रामध्ये 6.8-इंचाचा AMOLED WQHD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट असण्याची अपेक्षा आहे.
  • प्रोसेसर: सर्व तीन मॉडेल्स Adreno GPU सह Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असल्याचे समजते.तरी, अनेक देशांमध्ये, मोबाईल Exynos 2400 चिपसेटसह देखील येऊ शकतात.
  • कॅमेरा:Samsung Galaxy S24 Ultra 12MP आणि 10MP लेन्स + 3x झूमसह 200MP प्राथमिक कॅमेरासह क्वाड कॅमेरा सेटअपसह सुसज्ज असू शकतो. तर इतर दोन फोन 50MP प्राथमिक लेन्ससह 10MP आणि 2MP सेंसरसह दिले जाऊ शकतात.
  • बॅटरी:बॅटरीच्या बाबतीत, Samsung Galaxy S24 Ultra मध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
  • ऑपरेटिंग सिस्टम:Samsung Galaxy S24 सिरीज नवीन Android 14 वरील One UI 6 वर आधारित असू शकते.