फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : बाजारपेठेतील जेष्ठ व्यापारी लक्ष्मीकांत कोरगावकर ( ७५ वर्षे ) यांचे आज पहाटे त्याचे राहत्या घरी दुःखद निधन झाले. वृद्धापकाळातील आजारामुळे ते गेले वर्षभर औषधोपचार घेत होते. फोंडाघाट पंचक्रोशीत ते भर्माणा तथा अण्णा या टोपण नावाने सुपरिचित होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी, व्यापार-उदीम करताना, संत परंपरेची ओढ,फोंडाघाट हायस्कूलचे सदस्य,फोंडाघाट व्यापारी संघाचे सदस्य, देव राधाकृष्ण मंदिराचे ट्रस्टी यामधील त्यांचे योगदान सर्वांसाठी मार्गदर्शक होते. ग्रामपंचायत आणि फोंडाघाटच्या विकासात्मक वाटचालीत त्यांचा वाटा अमूल्य होता. नव्या पिढीला बरोबर घेऊन वाटचाल करण्याची त्यांची हातोटी- मुळे पंचक्रोशीत त्यांचा विशेष दबदबा होता.
त्यांचे पश्चात पत्नी,चार मुली, एक मुलगा,जावई- नातवंडे असा मोठा परिवार असून,आर.के. ग्रुपचे प्रसाद यांचे ते वडील होत. त्यांच्या अंत्ययात्रेत सर्व स्तरातील ग्रामस्थ- नातेवाईक सहभागी झाले होते. वैकुंठभूमीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हरहुन्नरी,ज्येष्ठ व्यापारी व्यक्तिमत्व अनंतात विलीन झाल्याचे दुःख पंचक्रोशीत व्यक्त होत आहे…..










