आमदार नितेश राणे यांची घेतली हेत येथील प्रकल्पग्रस्तांनी भेट

अरुणा प्रकल्पातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : आ. राणे यांचे आश्वासन

वैभववाडी | प्रतिनिधी : अरुणा प्रकल्पातील प्रलंबित प्रश्नाबाबत हेत गावातील प्रकल्पग्रस्तांनी आमदार नितेश राणे यांची वैभववाडी येथे भेट घेतली. संबंधित खात्याचे अधिकारी प्रकल्प बाधित नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे यावेळी प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या कडून सविस्तर माहिती घेतली. व लवकरच आपले सर्व प्रश्न मार्गी लागतील असे आश्वासन दिले.

यावेळी भाजपा पदाधिकारी भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, प्राची तावडे, बंड्या मांजरेकर, राजू पवार, मनोहर फोंडके, संतोष फोंडके, उत्तम फोंडके, अनंत फोंडके, प्रभाकर राठोड, संतोष फोंडके, अनंत मोरे, विठ्ठल फोंडके, सुरेश फोंडके, सुनील फोंडके, मनोहर शिवराम फोंडके व प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.