साखर- चौकीचीवाडीत नदीपात्रात बंधाऱ्याची निर्मिती

खेड (प्रतिनिधी) खेड तालुक्यातील पंधरागाव विभागातील साखर-चौकीचीवाडी येथे युवासेना तालुकाधिकारी सुरज रेवणे यांच्या माध्यमातून नदीपात्रात बंधाऱ्याची उभारणी करण्यात आल्याने पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

विद्यमान उपसरपंच संज्योती रेवणे यांनी बंधारा बांधण्याबाबत तालुकाधिकारी रेवणे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार सुरज रेवणे यांच्या माध्यमातून बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. यामुळे उपलब्ध झालेल्या पाणीसाठ्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. यासाठी कालिकामाता विकास मंडळाचे अध्यक्ष संजय रेवणे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष उतेकर, विष्णू उतेकर, सागर रेवणे, स्मितेश उतेकर, नेरूत्ति उतेकर, गणेश उतेकर, नाना पार्टे आदींनी प्रयत्न केले.