बांदा | प्रतिनिधी : बांदा येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिकी एकादशीला गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ वाजता काकड आरतीने हा सोहऴा आरंभ होईल. त्यानंतर दर्शनास सुरुवात होईल. सायंकाळी उत्सवमुर्तीचे मंदिरात वाजतगाजत आगमन होईल. सायंकाळी ५ ते ७ दरम्यान श्री विठ्ठल सोहिरा महिला भजन मंडळाची भजनसेवा होईल. ७ वाजता नित्य सायंआरती होईल. रात्री ९ वाजता श्रींचा पालखी सोहळा आरंभ होईल. त्यानंतर आजगांवकर दशावतार मंडळाच्या नाट्यप्रयोग होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर बांदा देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.










