निलेश राणे व राणे कुटुंबीय आमच्यासाठी देवदुतच !

भालावली सरपंच प्रकाश घवाळींची भावनिक प्रतिक्रिया

राजापूर | प्रतिनिधी : राजकारणापलिकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राणे परिवाराने कोकणातच नाही तर राज्य आणि देशपातळीवर अनेकांना मदतीचा हात दिला आहे. याचा प्रत्यय नुकताच तालुक्यातील भालावली गावचे सरपंच प्रकाश घवाळी यांना आला. अपघातामुळे घवाळी यांच्या पायाला झालेल्या गंभीर दुखापतीवर मुंबईतील नामांकित रूग्णालयात मोफत उपचार करून भाजपा नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी यांना घवाळी यांना नवं आयुष्य दिलं आहे. पायाच्या दुखापतीवर चांगल्या प्रकारे उपचार मिळाल्याने बरे झालेल्या घवाळी यांनी निलेश राणे आणि राणे कुटुंबीयांना धन्यवाद दिले आहेत.

निलेश राणे आणि राणे कुटुंबीय म्हणजे आमच्या सामान्यांसाठी देवदुतच असल्याचे त्यांनी नमुद केले आहे. सोशल मिडियावर एका व्हिडिओद्वारे घवाळी यांनी निलेश राणे व राणे कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

श्री. घवाळे हे भालावली गावचे सरपंच आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांना अपघात झाला आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्यांना चालणेही मुश्कील झाले होते. अलिकडेच रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या निलेश राणे यांच्या कानावर ही गोष्ट आली. त्यानी श्री. घवाळी यांची भेट घेतली व आपल्या मुंबई कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले. आपण चांगले उपचार करून तुंम्हाला यातुन बरे करू असा शब्द राणेंनी दिला. त्यानंतर घवाळी हे उपचारासाठी मुंबईत केले. तेथे गेल्यावर श्री. घवाळी यांना एका चांगल्या रूग्णालयात दाखल करून निलेश राणे यांच्या निर्देशानुसार त्यांच्यावर तेथे सर्व मोफत उपचार करण्यात आले.

उपचारानंतर श्री. घवाळी यांची प्रकृती सुधारली असून ते पहिल्या सारखे हिंडू फिरू लागले आहेत. माजी खासदार निलेश राणे यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने केलेल्या मदतीमुळेच आपल्यावर मोफत उपचार होवून आपण बरे झाल्याची भावना श्री. घवाळी यांनी व्यक्त केली आहे. या मदतीबद्दल श्री. घवाळी यांनी श्री. राणे तसेच मुंबई कार्यालयात काम पाहणारे जहीद खान व सहकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत. निलेश राणे व राणे कुटुंबीय म्हणजे आमच्यासारख्यांसाठी देवदुतच असल्याची प्रतिक्रीया घवाळी यांनी व्यक्त केली आहे. राजकारणापलिकडे जावून माणुसकीच्या नात्याने आवश्यक ती मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या निलेश राणे व राणे परिवाराचे कौतुक होत आहे. यासाठी राजापूरातून भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही श्री. घवाळी यांनी आभार व्यक्त केले आहेत.