शेतकरी सेना चिपळूण तालुकाध्यक्षपदी सुरेश घाग यांची निवड
चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिपळूण, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना महाराष्ट्र राज्य अंतर्गत महाराष्ट्र शेतकरी सेना रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी उमेश लटके तर शेतकरी सेना चिपळूण तालुकाध्यक्षपदी सुरेश घाग यांची नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्राचे सरचिटणीस वैभव खेडेकर व शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस संतोष नागरगोजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. यावेळी चिपळूण तालुका अध्यक्ष विश्वनाथ डोळस, तालुका सचिव संदेश साळवी उपस्थित होते. चिपळूण तालुक्याच्या वतीने या दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.











