मुरडेत कार्तिकी उत्सवाची २७ रोजी सांगता

विठ्ठल रखुमाई देवस्थानच्यावतीने विविध कार्यक्रमांना प्रतिसाद

 खेड(प्रतिनिधी)तालुक्यातील मुरडे येथील श्री देव विठ्ठल रखुमाई देवस्थानच्यावतीने कार्तिकी उत्सवास बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. २७ नोव्हेंबर रोजी उत्सवाची सांगता होणार आहे. यानिमित्त विविधांगी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त दररोज काकड आरती, आरती व देवे, भजन, कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

आहे.. बुधवारी आरती व देवे झाल्यानंतर रात्री मुरडे येथील गुरूप्रासादिक भजन मंडळाचे भजन व मंडणगड येथील अस्मिता सोमण यांचे कीर्तन झाले.

२३ रोजी रांगोळी स्पर्धा, महिला मंडळाचे भजन, आरती व देवे, भजन व कीर्तन होईल. २४ रोजी पौरोहित्य विलास काणे यांचे विष्णूयाग, आरती व देवे, मुरडे येथील सखी ग्रुपतर्फे गजर विठ्ठचा होईल, २५ रोजी रात्री ११ वाजेता’ स्वरनिनाद ग्रुपचा अवघा रंग एक झाला हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

 

२६ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा, तुळशी विवाह, त्रिपुर व आरती छबिना व रात्री ११ वाजता रत्नागिरी येथील नारायणी भगिनी मंडळाचे साजरे करूया सण संस्कृतीचे हा कार्यक्रम होईल, २७ रोजी सायंकाळी ७ वाजता शेजारती व रात्री

वाजता महाप्रसाद होईल. या उत्सवात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंच रोशन सिनकर, मोहन काणे, रोहित भोळे, शामसुंदर दळवी, श्रीधर जोशी यांनी केले आहे.