माजी सभापती संतोष घोसाळकर व संजय राणे यांचा उपोषणाचा इशारा

बॉक्साईडच्या अवजड व ओहरलोड वाहतूकीविरुद्ध घेतली आक्रमक भूमिका

मंडणगड | प्रतिनिधी : महाड ते मंडणगड, आंबडवे, देव्हारे चिंचघरे मार्गावर दापोली येथील कंपनीच्या माध्यमातून बेकायदेशीर साठा करुन ठेवलेल्या बॉक्साईडची अवजड व ओहरलोड वाहतूक मल्टी एक्सल वाहनांच्या साहाय्याने तालुक्याचे मुख्य मार्गावरुन केली जात आहे. या संदर्भात 15, 18, नोव्हेंबर 2022, 7 व 8 डिसेबर 2022 अशी चार वेळा तक्रार देवुनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने माजी सभापती संतोष घोसाळकर व संजय राणे यांनी 26 जानेवारी 2023 रोजी मंडणगड तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे 10 जानेवारी 2023 रोजी दिलेल्या निवेदनातील माहीतीनुसार 2 नोव्हेंबर 2022 पासून उपरोक्त संबंधीत ठेकेदार यांच्या माध्यमातून अवजड वाहनांनी ओव्हरलोड बॉक्साईड वाहतूक करीत आहे. वाहनांची वाहतूक ही रोवले, केळशी मांदीवली, देव्हारे, पाचरळ, पाले, तुळशी, मंडणगड भिंगळोली, केळवत, पालघर, कुंबळे, लाटवण, रेवतळ घाटाचे मार्गे महाड कंरजाणी अशी सूरु आहे. अवजड वाहनांचे ओव्हलोड वाहतूकीमुळे या मार्गावरील विविध अंतरात रस्त्याची पुर्णपणे दुर्दशा झाली आहे. या मार्गावर असणाऱ्या लहान मोठ्या पुलाची अवस्थाही गंभीर झाली आहे. यातील अनेक पुल धोकादायक स्थितीत आहेत. ओव्हरलोड वाहतूकीमुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुऴे या मार्गावर दुतर्फा असणाऱ्या आंबा, काजू पिक तसेच पाले भाज्यांचे पिकाचा –हास झालेला आहे. फळबागायतदारांचे प्रंचड प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंताक्रांत आहेत. या मार्गावरी शाळा, मंदिरे व बाजारपेठाही या समस्येने त्रस्त आहेत. मार्गावरी कुंबळे लाटवण, मंडणगड, देव्हारे, केळशी येथे बाजाराकरिता येणाऱ्या ग्राहकांना धुळाची त्रास होऊन त्यांच्या आरोग्याची हानी होत आहे. ओव्हलोड वाहतूक करणाऱ्या कंपनी व उत्खनंन करणारी आशापूरा कंपनी यांनी या संदर्भात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडू आवश्यक असणारी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. वाहतूक सुरु असलेल्या पुर्ण अंतरात दुचाकी तीनचाकी व लहान चारचाकी वाहनांनी रस्त्यावरुन प्रवास कऱणे अवघड झाले आहे. मोक्याच्या वा गर्दीच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या पादचाऱ्यांनीही वाहतूकीचा त्रास होत आहे. रस्त्यावर केव्हाही अपघात होण्याची शक्यता आहे. मंडणगड पोलीस निरिक्षक, उपविभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांनी या मार्गावर सुरु असलेली ओव्हरलोड बॉक्साईड वाहतूक करणाऱ्या चार पाच डंपरचे विरोधात दिखाव्यासाठी कारवाई केली आहे या मार्गावर 90 ते 120 डंपरची वाहतूक सुरु असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व प्रशासकीय यंत्रणांकडे केलेल्या तक्रारीवर कोणताही ठोस निर्णय अथवा कारवाई झालेली नाही. संबंधीत कार्यालयाकडे तक्रार करत असल्याने व विविध बाबी संबंधीतांचे निदर्शनास आणुत देतेवेळी काही दलाल तक्रारदारास धमकावत असून पैशाची मागणी केल्याचा खोट्या तक्रीरी करत आहेत. अशा दलालापासून आमच्या जीवास धोका असून ते आम्हास जीवे मारण्याची शक्यता आहे किंवा खंडणीचे खोटे गुन्हे ही दाखल करु शकतात यांची गांर्भीयाने दखल घेण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. रितसर तक्रीरीवर कोणतीही दखल न घेण्यात आल्याने प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात नमुद केले आहे. निवेदनाची प्रत सर्व संबंधीतांना पोहच करण्यात आली आहे.
या समस्येवर मार्ग काढण्यासाठी तक्रारादार व प्रशासन यांच्यात चार दिवसापुर्वी झालेल्या सभेत कोणताही तोडगा निघालेला नाही. तक्रारादर आपल्या मागणीवर ठाम आहेत, त्यामुळे प्रजासत्ताक दिनी त्यांनी घोषीत केलेल्या उपोषणाबद्दल पुर्ण तालुक्यास उत्सुकता लागून राहीली आहे.