किल्ले मंडणगड येथे माघी गणेशोत्सवाचे आयोजन

मंडणगड | प्रतिनिधी : नवयुवक तरुण मंडळ मंडणगड यांच्यावतीने माघी गणेश जंयत्तीचे निमीत्ताने किल्ले मंडणगड येथे 25 जानेवारी 2023 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे औचीत्यसाधून अभिषेक पुजा पाठ धार्मिक कार्यक्रमास किर्तन व स्नेहज्योती अंधविद्यालयाचे सुस्वर भजनाचा कार्यक्रमही आयोजीत कऱण्यात आला आहे. सौ. शिला लेंढे, सुभाष लेंढे, सौ. छाया लेंढे, राजेंद्र लेंढे यांच्या सौजन्याने पुजेनिमीत्त प्रसाद व खिचडी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमास तालुकावासीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष समिर लेंढे, उपाध्यक्ष राहूल कोकाटे, यांनी केले आहे.