कणकवली येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

कणकवली : कणकवली – माऊलीनगर येथील मैथिली अनिल जाधव (४५) रा. हिने ओढणीच्या सहाय्याने आपल्या घरात गळफास घेतल्याची घटना घडली आहे.

 

याबाबत तिचा पती अनिल मधुकर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून भांडण होतात, ती होऊ नये म्हणून पती सकाळी ८ वा. घराबाहेर पडला. तेव्हापासून तो घरी गेला नाही. दरम्यान ५.४५ वा. च्या सुमारास ते पटवर्धन चौकात असताना त्यांच्या लहान मुलाचा त्यांना फोन आला. त्यानी घरी जाऊन पाहिले असता पत्नी मैथिली ही ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली. यावेळी तिला खाली उतरवत उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ती मयत असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

 

याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात तिचा पती अनिल मधुकर जाधव यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास कणकवली पोलिस करीत आहेत. तिच्या पश्चात पती, दोन मुलगे, सासू, दीर असा परिवार आहे.