पी.एस.चोडणकर ज्वेलर्सचे आयोजन
भाग्य दिले तु मला’ फेम तन्वी मुंडले सोबत अनेकांनी घेतला “सेल्फीचा आनंद”
सावंतवाडी : येथील पी. एस.चोडणकर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘भाग्य दिले तु मला’ फेम तन्वी मुंडले अर्थात “कावेरी” हिच्या उपस्थितीत सावंतवाडीतील महिलांनी ‘खेळ खेळू सोन्या-चांदीचा’ या कार्यक्रमाचा लाभ घेतला.यावेळी खेळण्यात आलेल्या खेळात प्रथम उज्वला सावंत या पहिल्या क्रमांकाच्या तर फिजा शेख व्दितीय आणि सुप्रिया नेवगी यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षिस पटकावले.
यावेळी उपस्थित ५० महिलांना पी.एस. चोडणकर ज्वेलर्सच्या माध्यमातून खास भेटवस्तू देण्यात आली. यावेळी तन्वी मुंडले हिच्या हस्ते या बक्षिसाचे वितरण करण्यात आले. तर अनेकांनी तिच्या समवेत सेल्फी घेण्याचा आनंद लुटला. दिपावलीच्या निमित्ताने चोडणकर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून ‘स्नेहबंध’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवेदक नागेश नेमळेकर यांनी उपस्थित महिलांचे विविध गेम घेतले. यावेळी सावंत, शेख आणि नेवगी यांना सोन्या – चांदीचा समावेश असलेले बक्षीस मिळाले. तर सहभागी झालेल्या अन्य ५० महिलांना खास भेटवस्तू देवून तन्वी हिच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी पावन चोडणकर, श्रीपाद चोडणकर, पद्मजा चोडणकर, विजय चोडणकर, विनिता चोडणकर, मंगलदास चोडणकर, दिप चोडणकर, पुजा चोडणकर, मुकुल चोडणकर, संपदा चोडणकर, सिमा मठकर, अर्जुन मळव, सौरभ मालंडकर, सारिका धाऊसकर, पपिनो सावंत, सुरज नाटेकर, वैशाली काळसेकर आदी उपस्थित होते.












