मच्छिमारी करायला गेलेल्या वृद्ध खलाशाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी ः प्रतिनिधी : मच्छिमारी करण्यासाठी गेलेल्या बोटीवरील वृध्द खलाशाचा आकस्मिक मृत्यू झाला.ही घटना शनिवार 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वा.घडली.

देवजा महादेव तांडेल (60,रा.कासारवेली,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे.यातील खबर देणार हे मतीन दानियाल बोटीवरुन समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते.त्यावेळी बोटीवरील देवजा तांडेल हा खलाशी बोटीव झोपला होता.म्हणून खबर देणार त्याला उठवण्यासाठी गेले असता देवजा कोणतीही हालचाल करत नव्हते.त्यांनी देवजाला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केेले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी देवजाला तपासून मृत घोषित केले.याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.