रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील सांडेलावगण येथील चाळीत रहाणार्या प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला.ही घटना शनिवार 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वा.सुमारास उघडकीस आली. समीर चाँद मुलाणी (49,मुळ रा.करवीर कोल्हापूर सध्या रा.सांडेलावगण जयगड,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
याबाबत विनोद मधाळे यांनी जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली.त्यानुसार,शनिवारी दुपारी ते समीर मुलाणी यांना फोन करत होते.परंतू ते फोन उलचत नसल्याने त्यांनी समीर मुलाणी यांच्या रुमचा दरवाजा ठोठावून हाक मारली.रुममधून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने विनोद मधाळे यांनी बाथरुमच्या खिडकीवाटे समीर मुलाणी यांच्या रुममध्ये प्रवेश केला असता त्यांना मुलाणी हे बेशुध्द अवस्थेत मिळून आले.मधाळे यांनी मुलाणींना तातडीने वाटद खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी समीर यांना तपासून मृत घोषित केले.












