बेरोजगार दिव्यांगांना होणार रोजगार विषयक मार्गदर्शन ; तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा
जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन
कणकवली : ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यात विविध ठिकाणी, विविध जिल्ह्यांमध्ये दिव्यांग दिन शासन प्रशासन तसेच स्थानिक पातळीवर साजरा केला जातो.
कणकवली तालुक्यात देखिल एकता दिव्यांग विकास संस्थेच्या वतीने कणकवली गोपुरी आश्रम या ठिकाणी दरवर्षी ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा साजरा करण्यात येतो. यामध्ये आपल्या सोबत शालेय विद्यार्थ्यांनाही एक व्यासपीठ निर्माण व्हावं, समाजामध्ये दिव्यांगांविषयी आपलेपणा निर्माण होण्यासाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांकास पारितोषिक देखील वितरण करण्यात येणार आहे त्यामुळे स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन, एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत यांच्यावतीने करण्यात आले आहे.
निबंध स्पर्धेचे विषय :
१) जागतिक दिव्यांग दिन
२) दिव्यांग व्यक्तींबद्दल समाजाचा दृष्टीकोन
रांगोळी स्पर्धेचे विषय :
१) निसर्ग चित्र
स्पर्धेंसाठी कागद, रंग, पट्टी, पेन्सिल व पेन संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दिव्यांगांना रोजगारासाठी मार्गदर्शन
जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या दिव्यांग व्यक्तींना रोजगार निर्माण होण्यासाठी रोजगार बाबत मोफत मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. तर गरजू असलेल्या दिव्यांगांना योजनांचे अर्ज वाटप देखील करण्यात येणार आहे. तरी सर्व दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहायचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संस्थाध्यक्ष सुनील सावंत ९४२०६५४६२४ सचिव सचिन सादये ९८६०७१८९४९ यांच्याशी संपर्क साधावा.










