सावंतवाडी । प्रतिनिधी : अल्पवयीन युवतीवर अत्याचार करत मातृत्व लादल्याप्रकरणी शहरातील एका युवकावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबधीत युवतीने नातेवाईकांसोबत सावंतवाडी पोलिस ठाणे गाठत संबंधिता विरोधात तक्रार दिली होती.
याबाबत अधिक माहीती अशी की, संबधित युवक व युवती ही सावंतवाडी शहरात एकाच भागात राहतात. शैक्षणिक देवाण घेवाणीतून त्यांच्यात ओळख होऊन जवळीक वाढली त्यात दोघांमध्ये प्रेमसंबध जुळून आले होते. यातूनच हा प्रकार घडला. याबाबत संबधित मुलीने गुरुवारी नातेवाईकांसह पोलिसात धाव घेत त्या युवकाबाबत तक्रार दिली.
त्यानुसार संबंधिताविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव करित आहे.
Sindhudurg