पळसंब शाळा नं १ येथे युवा पिढी मार्गदर्शन शिबीर

श्री जंयती देवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाचे आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर : पळसंब येथील श्री जंयती देवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ यांच्या वतीने संकल्प युवा पिढी घडविण्याचा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पळसंब शाळा नं १ येथे करण्यात आले होते. त्रिंबक हायस्कुल शिक्षक एकनाथ मारुती गायकवाड, तसेच संस्था अध्यक्ष सुरेद्र सकपाळ यांनी मार्गदर्शन केले. प्रमोद सावंत यानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, खजिनदार वैभव परब यानी मान्येवराचे स्वागत केले. सुरेंद्र सकपाळ यांनी मोबाईलचे चांगले फायदे यावर मार्गदर्शन करत मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहणार आणि सहकार्याच्या भावनेने पळसंब गावातील नविन पिढीला त्यांच्या चांगल्या करियरसाठी सुजलाम सुफलाम करूया असे आवाहन केले. मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत, मार्गदर्शक श्री प्रमोद सावंत, सचिव श्री चंद्रकांत गोलतकर, खजिनदार श्री वैभव परब, अमित पुजारे, हितेश सावंत, बबन पुजारे, रुपेश पुजारे, प्रसाद पुजारे, सुनिल लाड तसेच विध्यार्थी उपस्थित होते.