तुळस चे सुपुत्र तथा मराठा समाज पालघर कार्याध्यक्ष विश्वास सावंत यांची मागणी
वेंगुर्ले l प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भेटीला जाऊन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुन्हा एकदा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आमदारकी जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र राणेसाहेबांनी केसरकरांना जवळ करू नये अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुळस गावचे सुपुत्र आणि मराठा समाज पालघर कार्याध्यक्ष विश्वास सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सावंतवाडी मतदारसंघात हा आमचा मतदारसंघ आहे. या मतदार संघात तुळस, पेंडूर, मातोंड, तळवडे, निरवडे, हो या सह अनेक गाव येतात. केसरकर यांच्या पहिल्या निवडणुकीचा पहिला नारळ आम्हीच ठेवला होता. तुळस येथील जैतिर मंदिरामध्ये. त्या पासून त्यांनी आमची कुठलीही कामे केली नाहीत. त्यावेळी आम्ही सर्वांचा विरोध असूनही राणेसाहेबांचे ऐकूनच केसरकर यांना मतदान केल आणि त्यामुळे ते निवडून आले. मात्र राणेसाहेबांवर खालच्या लेवलला टीका करणे आम्हाला सहन होणार नाही. त्याची त्याना जागा दाखवणे गरजेचे आहे, असेही सावंत यांचे म्हणणे आहे.
स्वतःच्या फायद्यासाठी रंग बदलणारे दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्हा सह राज्याला माहित आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात काम करताना नेहमी दहशतवादाच्या नावाखाली राणे साहेबांवर टीका केली. प्रत्येक निवडणुकीत राणेसाहेबांच्या विरोधात जन्मत निर्माण करण्याचा प्रयत्न केला . मात्र या साऱ्या विरोधाला राणे साहेब पूरून उरले. सध्या तर त्यांच्याकडे केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी भाजपाने टाकली आहे. आणि त्याला समर्पक असे काम राणेसाहेबांकडून होत आहे. दिवसेंदिवस राणे साहेबांना मोठं जनमत मिळत आहे. ते पाहून येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्यालाही फायदा व्हावा यासाठीच दीपक केसरकर यांची धडपड सुरू आहे.
तब्बल तेरा वर्षानंतर केसरकर यांनी राणे साहेबांच्या कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर जाऊन राणेसाहेबांची भेट घेतली. तसेच मी त्यांचा आदर करतो असे स्पष्ट केले. मात्र हा आदर केवळ आपल्या विजयासाठी चाललेली धडपड असल्याचेच दिसून येत आहे.
प्रत्येक वेळी राणेसाहेबांना विरोध करणाऱ्या आणि त्यांच्यावर नको नको ते आरोप करणाऱ्या दीपक केसरकर यांना राणेसाहेबांनी जवळ करू नये अशी मागणी आमच्यासारख्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे असे विश्वास सावंत यांनी म्हटले आहे.











