वैभववाडी प्रतिनिधी
भाजपाने मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या ठिकाणी विधानसभा निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळविल्यानंतर वैभववाडी भाजपाच्या वतीने तालुक्यात जल्लोष करण्यात आला. येथील कार्यालयासमोर फटाक्याची अतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, भाजपा पदाधिकारी भालचंद्र साठे, बंड्या मांजरेकर, शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील, शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश सावंत व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












