मालवण : नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलातील सर्व जवानांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या समुद्राचे रक्षण करण्याची त्यांची वचनबद्धता ही त्यांच्या कर्तव्याप्रती असलेल्या अतूट समर्पणाचा आणि आपल्या राष्ट्रावरील प्रेमाचा पुरावा आहे. प्रत्येक परिस्थितीत त्यांचा आत्मा आणि संकल्प अटल राहतो. त्यांची सेवा आणि बलिदानाबद्दल आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.
मी आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे नौदल दिनाच्या कार्यक्रमात सामील होण्यास उत्सुक आहे. या ठिकाणाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जवळचा संबंध आहे, छत्रपतींनी मजबूत नौदल उभारण्यासाठी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट










