राजापुरात रविवारी सकल हिंदू संमेलनाचे आयोजन

राजापूर वार्ताहर : हिंदू समाजाने सर्व प्रकारचे भेदभाव विसरुन हिंदू म्हणून संघटितपणे अनेक आव्हानांना सामोरे जाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठीच हिंदू धर्म परंपरा, संस्कृती व मूल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी विशाल सकल हिंदू संमेलन आयोजित केले आहे. तरी सर्वांनी पारंपारिक मंगल पोशाखात सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून धर्मकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .

राजापूर शहरातील यशोदिन सृष्टी येथे सकल हिंदू संमेलन रविवारी दि. २६ एप्रिल रोजी सकाळी १०.००ते दुपारी २.०० या वेळेत होणार आहे. सकल हिंदू समाजाने या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सकल हिंदू संमेलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे .