शहर कार्यकारिणी सदस्यपदी किरण बांद्रे, जाफर कटमाले
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजितदादा गट) उपाध्यक्षपदी सुरेश कदम यांची तर शहर कार्यकारिणी सदस्यपदी किरण बांद्रे, जाफर कटमाले यांची नियुक्ती करण्यात आली. हे तिघेही गोवळकोट विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाजवळ एका छोटेखानी कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रमेश राणे, नियोजन समिती सदस्य ज्येष्ठ नेते दादासाहेब साळवी, प्रदेश उपाध्यक्ष शौकत भाई मुकादम, चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, महिला तालुकाध्यक्ष जागृती ताई शिंदे, युवक तालुकाध्यक्ष निलेश कदम, युवक शहराध्यक्ष सिद्धेश लाड, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष समीर काझी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष कादिर परकार, पार्लमेंटरी बोर्ड सदस्य इम्रान कोंडकरी, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन साडविलकर, जयंत शिंदे, सिकंदर चिपळूणकर, सचिन शिंदे, आप्पा इंदुलकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.












