सावंतवाडीत रविवारी कॅरम सेमिनार

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी येथे रविवार दि.10 डिसेंबर रोजी मोफत कॅरम कोचिंग सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीतर्फे विदयार्थ्यांना मोफत कॅरम कोचिंग देण्यात येणार आहे.सेमिनारचे आयोजन जगन्नाथराव भोंसले उदयानाच्या मागील बाजूस मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत करण्यात आले आहे.

हा सेमिनार सकाळी 09.30 ते दुपारी 01.30 या वेळेत घेण्यात येईल. सहभाग घेणा-या विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. नाव नोंदणी व अधिक माहीतीसाठी विदयार्थ्यांनी 8007382783 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे.