अंतिम उत्तर तालिका जाहीर!
मसुरे | झुंजार पेडणेकर : राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी फायनल उत्तरपत्रिका आणि रिस्पॉन्स शीट प्रकाशित करण्यात आली आली आहे. तलाठी उत्तरतालिका 2023 रिस्पॉन्स शीट नुसार आक्षेप घेण्याची तारीख दिनांक २८ सप्टेंबर ते ०८ ऑक्टोबर २०२३ होती. त्यानुसार परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीने महसूल विभागाला आक्षेपांबाबत माहिती दिली असून एकूण २८३१ प्रश्नांसाठी १६२०५ आक्षेप घेण्यात आले होते. त्या पैकी १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप कंपनीने वैध ठरवले आहेत. वेगवेगळ्या शिफ्ट नुसार चुकीच्या काही प्रश्नांना पूर्ण गुण तर काहींचे यापूर्वी जाहीर केलेले उतरांचे पर्याय बदलण्यात आले आहेत. तलाठी अंतिम उत्तरतालिका २०२३ प्राप्त आक्षेपांबद्दल अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.











