मोदी आवास योजनेसाठी १ हजार १९९ चे लक्ष्य

दापोली l प्रतिनिधी:-दापोली पंचायत समितीकडे २०२३- २४ करिता मोदी आवास योजनेकरिता १ हजार १९९. तर रमाई आवास योजनेसाठी २० घरांचे टार्गेट निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येकाचे पक्के घर असावे,

यासाठी शासनाकडून घरकुल योजना मागील अनेक वर्षापासून राबविली जाते. दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आवास योजनांचे पं. स.ला टार्गेट देण्यात येते. यावर्षीं मोदी आवास योजनेकरिता १ हजार १९९, रमाई आवास योजना २० घरांचे टार्गेट आहे, तर प्रधान मंत्री आवास योजनेचे टार्गेट अद्याप देण्यात आलेले नाही. घर बांधणीसाठी अर्थात घरकुल योजनेकडून १ लाख २० हजारांचे अनुदान शासनाकडून देण्यात येते.