मालवण-विजापूर, विजापूर मालवण एसटी बस सेवा सुरु 

मालवण : मालवण एसटी आगारातून विजापूर मार्गांवर बस सेवा सुरु करण्यात आली आहे. सोमवार 11डिसेंबर पासून ही फेरी सुरु होणार आहे. सकाळी 9:15 मालवण विजापूर ही बसफेरी फोंडा अथनी मार्गे निघणार आहे. तसेच विजापूर येथून दुपारी 11:30 विजापूर मालवण ही बसफेरी नियमित असणार आहे. अशी माहिती मालवण आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी शुक्रवारी दिली.