बांदा l प्रवीण परब : बांदा येथील श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या सल्लागार पदी भारतीय जनता पार्टिचे बांदा शहर अध्यक्ष व धडाडीचे कार्यकर्ते नरसिंह उर्फ बाबा काणेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. बाबा काणेकर हे साईभक्त असून साईबाबा विषयी त्याना आस्था आहे. ते धडाडीचे कार्यकर्ते व मनमिळावू असल्याने आमच्या मंडळाला चांगला उपयोग होईल असे राकेश केसरकर यांनी सांगितले.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष रविद्र मालवणकर, सचिव दत्तप्रसाद केसरकर, खजिनदार राजेश कारेकर, शैलेश केसरकर, प्रितेश केसरकर, मनोज कल्याणकर, साईराज साळगावकर, मंगलदास साळगावकर, किशोर साळगावकर, प्रितम हरमलकर, सुशांत पांगम, प्रशांत पांगम, बंड्या हरमलकर, सतीष येडवे, संदेश पावसकर, आशुतोष भांगले, दर्शना केसरकर, राजश्री तेंडले, संकल्प केसकर, राज हरमलकर उपस्थित होते.
बांदा शहरातील साईभक्त कै. बाप्पा केसरकर संस्थापित साईमठात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम वर्षभर साजरे होत असतात. या दस-या दिवशी साईबाबा पुण्यतीथी उत्सव, रामनवमी उत्सव, सामुदायिक श्री साई सतचरीत्र वाचन, काकड आरती, भजन, दर गुरूवारी अभिषेक व साईची मध्यान आरती असे विविध कार्यक्रम श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या आयोजनातून साजरे होतात. श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाची स्थापना सन २०१८ मध्ये झाली असून धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून केले जातात. सिधूदूर्ग जिल्हात सामाजिक कार्यात हे मंडळ अग्रेसर आहे.










