राजापूर (वार्ताहर): येथील विमा प्रतिनिधी सौ. शिल्पा मराठे यांना सलग दुसऱ्या वर्षी एलआयसी एमडिआरटी हा आंतरराष्ट्रीय बहुमान प्राप्त झाला आहे. याबद्दल त्यांचा एलआयसी राजापूर शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सौ. मराठे यांना सलग दुसऱ्यांदा बहुमान प्राप्त झाला आहे. त्यांनी विमा प्रतिनिधी म्हणून केलेल्या कामाची दखल घेवून एलआयसीने त्यांना एमडीआरडी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
त्यांना प्राप्त झालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचा एलआयसी राजापूर शाखेच्या वतीने शाखाधिकारी सुनिल बुगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विकास अधिकारी श्रीकृष्ण कामतेकर तसेच धनंजय मराठे व अन्य कर्मचारी वृंद उपस्थीत होता.या सन्मानाबद्दल सौ. मराठे यांनी विमा पॉलिसी धारक, एल.आय.सी शाखाधिकारी, विकास अधिकारी आणि कर्मचारी वृंद व हितचिंतकांना धन्यवाद दिले आहेत.









